आरती संग्रह

A collection of sacred arties honoring various gods and goddesses

|| गणपतीची आरती ॥

सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची|

नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची |

सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|

कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥

जय देव, जय देव जय मंगलमूर्ती|

दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥

रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|

चंदनाची उटी , कुमकुम केशरा|

हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |

रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया|

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥

लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना |

सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना|

दास रामाचा, वाट पाहे सदना|

संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|

जय देव जय देव, जय मंगलमूर्ती|

दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥

॥ श्री शंकराची आरती ॥

लवथवती विक्राळा ब्रह्मांडीं माळा । वीषें कंठी काळा त्रिनेत्रीं ज्वाळा । लावण्यसुंदर मस्तकीं बाळा । तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा। आरती ओंवाळू तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु.॥

कर्पुरगौरा भोळा नयनीं विशाळा । अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा। विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा। ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा । जय देव० ॥ २ ॥

देवीं दैत्यीं सागरमंथन पैं केलें । त्यामाजीं अवचित हलाहल जें उठिलें । तें त्वां असुरपणें प्राशन केलें । 'नीलकंठ' नाम प्रसिद्ध झालें जय० ३ ||

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी। पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी। शतकोटीचें बीज वाचे उच्चारी। रघुकुलतिलक रामदासाअंतरी ॥ जय देव० ॥ ४ ॥

॥ श्री देवीची आरती ॥

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारीं। अनाथनाथे अंबे करुणा विस्तारीं। वारीं वारीं जन्म-मरणातें वारीं। हारीं पडलों आतां संकट निवारीं ॥ १ ॥ जयदेवी जयदेवी जय महिषासुरमर्दिनी । सुरवर-ईश्वरवरदे तारकसंजिवनी ध्रु. ।।

त्रिभुवनभुवनीं पाहतां तुजऐशी नाहीं। चारी श्रमले परंतु न बोलवे कांहीं। साही विवाद करितां पडिलें प्रवाही। ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी । सुरवर-ईश्वरवरदे तारक० ॥

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासां । क्लेशांपासुनि सोडविं तोडीं भवपाशां। अंबे तुजवांचून कोण पुरवील आशा। नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३॥ जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी । सुरवर-ईश्वरवरदे तारक० ॥

|| श्रीदत्तात्रेय आरती ||

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा। त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा । नेती नेती शब्द न ये अनुमाना ॥ सुरवर मुनिजन योगी समाधीन ये ध्याना ॥ १ ॥

सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।अभाग्यासी कैची कळेल ही मात ॥ पराही परतली तेथे कैचा हा हेत । जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥

दत्त येऊनिया ऊभा ठाकला । भावे साष्टांगे प्रणिपात केला ॥ प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥

दत्त दत्त ऐसें लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन ॥ मी तू पणाची झाली बोळवण । एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥

FAQs

What is Arti Sangrah?

It's a collection of devotional songs for various gods and goddesses.

Can I share Arti with others?

Yes, once uploaded, your Arti can be shared with friends and family through social media or direct links.

We aim to include Arti for many deities, but the collection grows with user contributions.

Are all gods and goddesses included?
Is there a cost to use this site?

No, the site is free to use for everyone who loves devotional music.

Get In Touch

Have questions about the arti sangrah? Reach out anytime!

Call

555-1234

Email

artisangrah@example.com

© 2025 Shreemoksha. All rights reserved.

calling Hours

Morning: 8:00 AM – 12:00 PM

Evening: 4:00 PM – 10:00 PM

Special Pujas:
Weekends & Festival Days

(pre-booking necessary)

Contact Us

+91 7887662415

info@shreemoksha05@gmail.com

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥